
PNB मध्ये झालेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी आता अँटिग्वामधूनही फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी त्याचा शोध सुरू असल्यावर तो अँटिग्वामध्ये असून त्याने तेथे नागरिकत्व घेतल्याची माहिती मिळाली होती. देशाबाहेर पळून गेल्यानंतर तो तपास यंत्रणांना हुलकावणी देत होता. आता तो अँटिग्वामधूनही फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.
अँटिग्वा आणि बरबुडाचे परराष्ट्रमंत्री चॅग ग्रीन यांनी ही माहिती दिली आहे. मेहुल चोक्सी हा आता अँटिग्वामध्ये नाही आहे. मेहुल चोकसी हा उपचारांसाठी अन्यत्र कुठेतरी गेला आहे. आमच्या देशाची नागरिकत्व योजना ही विश्वसनीय आहे. तसेच त्यामध्ये विविध स्तरांवर पडताळणी केली जाते. चोक्सीला नागरिकत्व दिलं गेलं तेव्हा त्याने हिंदुस्थान किंवा इतर कुठल्याही देशातील कायद्यांचं उल्लंघन केल्याची बाब समोर आली नव्हती. आता फरार झालेल्या चोक्सीचा शोद पुन्हा घेण्यात येत आहे. याप्रकरणी अँटिग्वा सहकार्य करणार असल्याचेही सांगण्यात आले.