अँटिग्वातून फरार झालेला मेहूल चोक्सी बेल्जियममध्ये; बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला आश्रय

PNB तील हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही पसार झाला होता. आता त्याने बेल्जियममधील अँटवर्प येथे पत्नीसोबत आश्रय घेतल्याचे उघड झाले आहेत. त्याने बेल्जियममधील रेसिडेन्सी कार्ड मिळवलं आहे. देशातील अधिकाऱ्यांनी त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बेल्जियम सरकारला विनंती केली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

मेहूल चोकसी हा 13 हजार 500 कोटी रुपयांच्यां PNB घोटाळ्यातील आरोपी आहे. तो आधी अँटिग्वामध्ये लपून बसला होता. आता काही दिवसांपूर्वी तो तिथून पसार झाला असून त्याने बेल्जियममध्ये आश्रय घेतला आहे. मेहूल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी ही बेल्जियमची नागरिक आहे. तिच्यासोबत बेल्जियममधील अँटवर्प येथे एफ रेसिडेन्सी कार्ड मिळवून राहत आहे. रेसिडेन्सी कार्ड मिळवण्यासाठी त्याने बेल्जियमच्या प्रशासनाला बनावट कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर येत आहे. तो आजारपणासाठी अँटिग्वा सोडून गेल्याची माहिती देण्यात आली होती.