मेघना कीर्तिकर यांचे निधन

माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी आणि शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या आई मेघना कीर्तिकर यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली गौरी पाठारे, हर्षदा मोरे, सून सुप्रिया असा परिवार आहे. मेघना कीर्तिकर यांच्या पार्थिवावर गोरेगाव पूर्व येथील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी मेघना कीर्तिकर यांचे अंत्यदर्शन घेऊन कीर्तिकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, अनिल परब, अनंत नर, हारून खान, माजी आमदार विनोद घोसाळकर, विलास पोतनीस, रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांच्यासह सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मेघना कीर्तिकर यांचे अंत्यदर्शन घेतले.