मध्य रेल्वेवर उद्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱया डाऊन धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.19 पर्यंत सुटणाऱया अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत सुटणारी पनवेल/बेलापूर डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.