
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तरी वीकेण्डला फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक बघून घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.