
मध्य रेल्वेवर रविवारी अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला आहे. मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत पाच तासांचा ब्लॉक असेल. यादरम्यान मस्जिद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसेल. तसेच ट्रान्स हार्बर लाईनवर ठाणे आणि वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 या वेळेत ब्लॉक असेल. ठाण्याहून वाशी, नेरूळ, पनवेल येथे जाणाऱ्या लोकल सकाळी 10.35 ते संध्याकाळी 16.07 पर्यंत रद्द केल्या आहेत.