
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 पर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. या ब्लॉक काळात पनवेल-कुर्ला-पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. तसेच हार्बरच्या प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.