देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी तीनही रेल्वे मार्गावर रविवारी 10 नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ट्रॅक दुरूस्ती, सिग्नलिंग अपडेट आणि ओव्हरहेड उपकरणाच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. माहीम ते गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान हार्बर लाईन रेल्वे मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन्सवर 11.00 ते 16.00 वाजेपर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-वांद्रे-सीएसएमटी, सीएसएमटी/पनवेल – गोरेगाव – सीएसएमटी/पनवेल मध्य आणि चर्चगेट – गोरेगाव – चर्चगेट स्लो रेल्वेसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेवर सीएसएमटीवरून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथे डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील. मेगाब्लॉकदरम्यान नियमित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा गाड्या धावतील.
सकाळी 10.50 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर लाईनवरील सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि सकाळी 10.22 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या पनवेल अप हार्बर मार्गावरील गाड्या आणि सकाळी 10.45 ते दुपारी 5.13 वाजेपर्यंत गोरेगाव आणि वांद्रे येथून सीएसएमटीहून सुटणाऱ्या वांद्रेसाठीच्या यूपी सेवा रद्द राहतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाईन आणि वेस्टर्न लाईन स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेल मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येतील.