
पती सौरभचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला पोलिसांनी अटक केली असून दोघांची रवानगी तुरुंगात केली आहे. पण दोघांना एकत्र रहायचे आहे तसेच साहिलने प्रशासनकडे ड्रग्ज मागितले आहे. प्रशासनाने त्यांच्या मागण्या फेटाळल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साहिल हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. त्याला ड्रग्ज न मिळाल्याने तो बेचैन असून त्याची चिडचीड होतेय. त्यामुळे तुरुंगातील कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे मुस्कान शांत असून ती कुणाशी फार बोलत नाहिये. सुरुवातीला मुस्कानने अन्न पाण्याला हात लावला नव्हता. पण आता ती नियमितपणे जेवतेय. पण दोघांना एकमेकांशिवाय करमत नाहिये. दोघांनी एकत्र राहण्याची मागणी केली आहे. साहिलने तर प्रशासनाकडेच ड्रग्जची मागणी केलीये. प्रशासनाने दोघांची मागणी फेटाळून लावली आहे. साहिलची तब्येत बिघडल्याने त्याला नशामुक्ती केंद्रात नेला जात आहे. प्रशासनाने दोघांवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहे.