माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराचे आज वितरण

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि युवतींचा दरवर्षी परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळ आणि शिवराज प्रतिष्ठानतर्फे माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. हा पुरस्कार सोहळा उद्या, रविवारी सायंकाळी 5 वाजता परळच्या शिरोडकर हायस्कूल येथे होणार आहे.

मंडळाचे संस्थापक आनंद गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱया या कार्यक्रमाला विभागप्रमुख आमदार महेश सावंत, लोकसभा समन्वयक सुधीर साळवी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, प्रतिमा नाईक, गौरी कदम, मानसी कामत, श्रेया जामदार, विद्या राबडिया, नीलम मिरगळ, सुवर्णा गुराम, कविता पाटील, मयूरी परब यांनी केले आहे.