अनेक समस्यांवर औषधी गुळवेल शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर…

आयुर्वेदानुसार गुळवेलचा रस हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. सध्याच्या खराब जीवनशैलीमुळे शरीरात अनेक होर्मोनल बदल होत असतात. त्यामुळे अनेक समस्या होण्याची शक्यता असते. त्या समस्यांवर गुळवेलीचा रस उपायकारक ठरु शकतो. गुळवेलीच्या दैनंदिन सेवनाने शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते.

गुळवेलीचा रस पिण्याचे फायदे

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते – गुळवेलीचा रस प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते , रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. आणि ताप, सर्दी, खोकला यांसारखे त्रास होत नाहि.
  • पचनसंस्था सुधारते – जास्त प्रमाणात अपचन होत असल्यास पचनक्रिया सुधारण्यास गुळवेलीचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो.
  • त्वचेसाठी फायदेशीर – गुळवेलीचा रस प्यायल्याने त्वचेवर होण्याऱ्या विषारी घटकांना कमी करण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील पिंपल आणि डाग कमी होण्यास मदत होते.
  • मधुमेह नियंत्रीत ठेवते – गुळवेलीचा रस प्यायल्याने शरिरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत राहते.

तसेच रक्तदाबाचा त्रास असलेले,गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी गुळवेलीच्या रसाचे सेवन करु नये यामुळे समस्या होऊ शकतात.