
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात कारचालकाचा रक्ताचा नमुना बदलणारे ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे व डॉ. श्रीहरी हाळनोर यांचा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने वैद्यकीय परवाना निलंबित केला आहे. डॉ. तावरे, डॉ. हाळनोर हे कारागृहात असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत दोघांचेही परवाने निलंबित राहणार आहेत. निकाल लागेपर्यंत या दोघांनाही वैद्यकीय सेवेत काम करता येणार नाही, असेही मेडिकल कौन्सिलने स्पष्ट केले आहे.