अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाईक आणि सरनाईक

अमोल काळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी वर्तमान सचिव अजिंक्य नाईकसह उपाध्यक्ष संजय नाईक, टी-20 लीगचे कार्याध्यक्ष विहंग सरनाईक आणि काँग्रेस नेते भूषण पाटील यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची

अंतिम तारीख
16 जुलै असून 23 जुलैला मतदान होणार आहे. विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळे काही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे केवळ चारच अर्ज भरले गेले.