MCA Election – शरद पवार गटाच्या अजिंक्य नाईक यांनी मैदान मारले, ठरले सर्वात युवा अध्यक्ष

फोटो - रुपेश जाधव

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली. आशिष शेलारांनी पाठिंबा दिलेल्या संजय नाईक यांचा अजिंक्य नाईक यांनी 107 मतांनी पराभव केला आणि अध्यक्षपदावर आपली मोहर उमटवली. विशेष म्हणजे अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.

MCA चे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे मुबंई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. काँग्रेस नेते भूषण पाटील यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्यामुळे अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक यांच्यामध्ये थेट लढत झाली. या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांना 221 मते मिळाली, तर संजय नाईक यांना 114 मते मिळाली.