एक आठवडय़ापूर्वी फुटलेल्या एमबीबीएसच्या पेपरची चौकशी सुरू असतानाच 9 डिसेंबर रोजी दुसऱयांदा पेपरफुटीची घटना घडली. हे लक्षात येताच दुसरी प्रश्नपत्रिका देऊन लगेचच पेपर घेण्यात आला. 2 डिसेंबर रोजी फार्माकोलॉजी-1 या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याने पेपर रद्द करण्यात आला. फेरपरीक्षा 19 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, सोमवारी, 9 डिसेंबर रोजी एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या सी.बी.एम.ई. 2019 या अभ्यासक्रमाच्या पॅथॉलॉजी-2 या विषयाची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्यापूर्वी एक तास आधी फुटली, याबाबतचा ई-मेल विद्यापीठाला प्राप्त झाला. याची दखल घेऊन तातडीने दुसरी प्रश्नपत्रिका देऊन हा पेपर घेण्यात आला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यास कळविण्यात आल्याचे विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.