आर जी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता कोलकाता पुन्हा एकदा हादरले. याच कॉलेज आणि रुग्णालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी 20 वर्षीय विद्यार्थीनी कामरहाटी ईएसआय रुग्णालयाच्या क्वॉर्टरमध्ये तिच्या खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली.
तिची आई येथे डॉक्टर म्हणून काम करते. तर तिचे वडील बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. दरम्यान, विद्यार्थीनी खोलीत एकटीच होती. वारंवार फोन करूनही तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर आईने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा तिचा मृतदेह आढळला.