‘माझी वसुंधरा अभियाना’त नगर जिह्यातील 15 ग्रामपंचायतींना 6.15 कोटी रुपयांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यासह राज्यात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल नगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांना राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा व नाशिक विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात झाला.
नगर जिह्यात ‘माझी वसुंधरा अभियान’ जिल्हा परिषदेने सीईओ आशीष येरेकर यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे ग्रामीण भागात उत्कृष्ट कामकाज करण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नोडल अधिकारी समर्थ शेवाळे, जिल्हा समन्वयक रवींद्र ठाणगे यांच्यासह गटविकास अधिकारी, सरपंच यांनी योगदान दिले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींना मिळालेल्या बक्षिसांची रक्कम ही हरित क्षेत्र वाढवण्यासाठी, पर्यावरणपूरक उपायोजनांसाठी वापरण्यात येणार आहे.
विजेत्या ग्रामपंचायती, कंसात तालुका व मिळालेले बक्षीस ः घुलेवाडी (संगमनेर, 75 लाख), मिरजगाव (कर्जत, 75 लाख), लोणी बुद्रूक (राहाता, 50 लाख), गुंजाळवाडी (संगमनेर, 15 लाख), वाघोली (शेवगाव, 50 लाख), खांडगाव (संगमनेर, 50 लाख), आव्हाने बुद्रूक (50 लाख), पेमगिरी (संगमनेर 15 लाख), चिंचोली गुरव (संगमनेर 15 लाख), लोणारे (संगमनेर 15 लाख), तिगाव (संगमनेर 50 लाख), जाफराबाद (श्रीरामपूर 50 लाख), चौकाते (15 लाख), धांदरफळ बुद्रूक (संगमनेर 15 लाख), संवत्सर (कोपरगाव 75 लाख).