चार वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वारंवार धमकीचे फोन कॉल्स करणाऱया आरोपीला शनिवारी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले आणि दहा दिवसांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. पलाश बोस असे आरोपीचे नाव आहे. त्याने न्यायालयापुढे गुह्याची कबुली दिली. त्याला एटीएसच्या जुहू युनिटचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या सहकाऱयांनी कोलकात्यातून अटक केली होती.
जिम ट्रेनर असलेल्या पलाशला 10 सप्टेंबर 2020 रोजी अटक केली होती. त्याने तत्कालीन मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांना अज्ञात दूरध्वनी क्रमांकावरून धमक्या देण्यास सुरुवात केली होती. याप्रकरणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नंतर एटीएसच्या जुहू युनिटचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी तपास सुरू केला. यादरम्यान धमकीचे फोन कॉल्स करणारा कोलकात्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एटीएसने कोलकाता गाठून पलाशला अटक केली होती. पलाशविरुद्ध 17 सप्टेंबर 2022 रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला होता. तथापि, शनिवारी त्याने गुन्हा कबूल केला आणि दया दाखवण्याची विनंती केली.
15 वर्षे दुबईत राहून मायदेशी परतला!
पलाश बोस दुबईत 15 वर्षे राहिला होता. त्यानंतर तो हिंदुस्थानात परतला होता. एटीएसने अटक केली त्यावेळी त्याच्याकडे दुबईतील मोबाईलची तीन सिमकार्ड आढळली होती. तो एक अॅप डाऊनलोड करून मुंबईतील राजकीय नेत्यांना पह्न का@ल करायचा. त्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दाऊद इब्राहिमचे नाव सांगून धमक्या दिल्या होत्या.