
सोशल मिडिया, टेलिव्हिजन मालिकांमधुन घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळचा आगामी चित्रपट मुक्काम पोस्ट देवाच घर या चित्रपटाच पोस्टर लॉन्च झाले आहे. हा चित्रपट 31 जानेवारी ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सिद्धिविनायकाच्या चरणी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि मायच्या हस्ते प्रदर्शित केले.
View this post on Instagram
किमाया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांनी केले असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर चिनार – महेश यांचं श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटात केले आहे.
कमी वयात जगभरात लोकप्रिय झालेली मायरा वायकुळची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.