
बसपा अध्यक्षा मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची पक्षाच्या समन्वयक पदासह सर्व पदावरून हकालपट्टी केली आहे.याच आकाश आनंद यांची मायावतींनी त्यांचे उत्तराधिकारी जाहीर केले होते तसेच त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदी ही नेमणूक केली होती.
मायावती यांनी आज पक्षाची एक महत्त्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर आकाश आनंद यांच्या जागी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांची राष्ट्रीय समन्वयक पदावर नेमणूक केली आहे. यापूर्वी मायावती यांनी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्याकडील पक्षाच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या होत्या.