उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन 40 ते 50 लोक मृत्युमुखी पडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मौनी महाराज म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौनीबाबांनी महाकुंभाच्या सेक्टर-6 येथील शिबिरात भू-समाधी घेतली आहे.
जवळपास तीन तास भूगर्भात अखंड तपश्चर्या केली. जखमी भाविक आणि मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि महाकुंभमेळा शांततेत पार पडावा यासाठी त्यांनी भू-समाधी घेतली. मौनी महाराजांची ही 57 वी भू-समाधी होती. मौनी महाराज हे अमेठीच्या बाबूगंज येथील सागर आश्रमाचे प्रमुख आहेत. महाराजांचे पूर्ण नाव शिवयोगी आहे. ते 13 वर्षांपासून मौन पाळत आहेत, म्हणून लोक त्यांना मौनीबाबा म्हणतात. त्यांचा जन्म प्रतापगडच्या पट्टी भागात झाला. राष्ट्रहिताच्या भावनेने आणि भगवान शिवाच्या दर्शनाच्या इच्छेने महाराजांनी 1989 मध्ये मौन पाळले होते. मौनी महाराज पहिल्यांदा नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात समाधी घेण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी अखंड 41 दिवस भू-समाधी घेतली.
माहिती गुप्त ठेवली
चेंगराचेंगरीच्या अपघातानंतर मौनीबाबा खूप दुःखी आहेत. यासाठी त्यांनी महापुंभातील विरोधकांची वाईट नजर घालवण्यासाठी भू-समाधी साधना करण्याचा निर्णय घेतला. ही साधना करण्यापूर्वी त्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होत़ी