
हिंदुस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रमजानमध्ये उपवास केला नाही म्हणून ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शबाबुद्दीन रझवी यांनी त्याच्यावर निशाणा साधला होता. आता मौलानांनी शमीच्या मुलीने होळी खेळली म्हणून संताप व्यक्त केला असून तिने होळी साजरी करणे बेकायदेशीर आणि शरियतच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.
शमीची मुलगी लहान आहे. जाहिर तिने अजाणतेपणी होळी साजरी केली असेल तर तो गुन्हा नाही. पण, जर तीला समजत असेल आणि ती जाणूनबुजून होळी खेळली असेल तर शरीयतनुसार हा गुन्हा आहे, असे मौलाना यांनी म्हटले आहे. शमीच्या मुलीने होळी खेळणे इस्लामविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.