
गेल्या मोसमात तळाला असलेले गुजरात जायंट्स आणि पंजाब किंग्ज हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. उभय संघांमध्ये जोस बटलर आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे फटकेबहाद्दर असल्यामुळे मोदी स्टेडियमवर षटकारबाजी होणार हे निश्चित आहे. दोन्ही संघांची ताकद एकसारखी असल्यामुळे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या हिंदुस्थानच्या धडाकेबाज खेळाडूंमध्येही कट्टर द्वंद्व पाहायला मिळणार यात तीळमात्र शंका नाही.
संभाव्य अंतिम 12 जणांचा संघ
पंजाब किंग्ज ः प्रभसिमरन सिंह, जॉश इंगलिस (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, निहाल वधेरा, मार्कस स्टायनिस, शशांक सिंह, मार्को यान्सन, हरप्रीत ब्रार, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स ः शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, ग्लेन फिलीप्स, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवथिया, राशीद खान, साई किशोर, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.