
वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये पहाटे लागलेल्या आगीत क्रोमा शोरुम जळून खाक झाले. इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे ही आग जास्त भडकली आणि या आगीने भीषण रूप धारण केले. अग्निशमन दलाने आगीला लेव्हल चारची आग जाहीर केले. मात्र, चार तासांच्या अथक प्रयत्नांनी जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीत कोटय़वधीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.