वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळ भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

नवी मुंबईतील वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळील परिसरात भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

वाशी एपीएमसीजवळ सिडकोच्या गृहप्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या ट्रांजिस्ट कॅम्पला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे.

या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस या घटनेबाबत अधिक माहिती घेत आहेत.