मुंबईतल्या गोरेगावमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील गोरेगाव पूर्वमध्ये भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गोरेगावमधील फिल्मसिटीच्या गेटवजवळ संतोष नगर भागात सायंकाळी साडे सातच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून एक रुग्णवाहिका सुद्धा आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळालेले नाही.