Benefits Of Almond Oil For Skin- त्वचा तरुण दिसण्यासाठी, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी ‘या’ तेलाने चेहऱ्याला मसाज करा!

त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर मुरुम आणि अकाली सुरकुत्या येण्याची समस्या उद्भवू शकते. हे टाळण्यासाठी लोक अनेक सौंदर्य उपचार किंवा घरगुती उपचारांचा अवलंब करतात. आपण घरच्या घरी बदाम तेल वापरून त्वचेवरील अकाली सुरकुत्या कमी करु शकतो. बदामाचे तेल चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचेला तजेला तर येतोच, त्याशिवाय त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

 

बदाम तेलाचे गुणधर्म

 

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. व्हिटॅमिन ई त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.

 

बदामाच्या तेलामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी अ‍ॅसिड असतात, जे त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करतात. त्वचा कोरडी झाली की, सुरकुत्या येऊ लागतात. फॅटी अ‍ॅसिड त्वचेला हायड्रेट ठेवतात.

 

बदाम तेलात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करू शकतात.

 

बदाम तेल खरोखरच सुरकुत्या कमी करते का?

बदाम तेल आपण मॉइश्चरायझर म्हणून वापरले तर ते सुरकुत्या कमी करू शकते. यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते.

कसे वापरायचे?

बदाम तेल लावण्यापूर्वी, चेहरा पूर्णपणे धुवा आणि स्वच्छ करा. यानंतर, चेहऱ्यावर तेलाचे काही थेंब लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. चेहऱ्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते. चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही ते रात्री लावू शकता आणि झोपू शकता.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)