सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे लिम्फोमामुळे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. ओसामू सुझुकी यांनी आपल्या कार्यकाळात कंपनीच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेत कंपनीला यशाच्या शिखरावर पोहचवले. ओसामु सुझुकी यांच्या कार्यकाळातच भारतीय कंपनी मारुतीसोबत सुझुकीची भागीदारी सुरू झाली.
ओसामू यांनी जवळपास 40 वर्षे कंपनीचे नेतृत्व केले. या काळात त्यांनी दोनदा अध्यक्षपद भूषवले. सुझुकी मोटरने उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये आपले नेटवर्क विस्तारण्यासाठी जनरल मोटर्स आणि फोक्सवॅगनसोबत धोरणात्मक भागीदारीही ओसामू यांच्या मार्गदर्शनाखाली केली. ओसामु यांना त्यांच्या कार्यकाळात अनेक आव्हानं पेलावी लागली.