1 फेब्रुवारीपासून महागणार मारुती सुझुकीच्या ‘या’ कार्स, जाणून घ्या सविस्तर माहिती

मारुती सुझुकी इंडिया आपल्या कारच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. मारुतीची सर्वात स्वस्त कार Alto K10 देखील सुमारे 20 हजार रुपयांनी महाग होणार आहे. मारुती सेलेरियोची किंमत सर्वाधिक वाढणार आहे. या कारची किंमत 30 हजार रुपयांनी वाढणार आहे.

मारुतीची सर्वात स्वस्त कार झाली महाग

मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त कार Alto K10 आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. आता 1 फेब्रुवारीपासून या कारची किंमत वाढणार आहे. मारुतीच्या सर्वात स्वस्त कारची किंमत 19,500 रुपयांनी वाढणार आहे. मारुतीच्या या कारच्याच नव्हे तर सर्व मॉडेल्सच्या किमतीत वाढ होणार आहे. मारुतीच्या वाहनांमध्ये जिमनी आणि सियाझच्या किमती फक्त 1,500 रुपयांनी वाढू शकतात.

यातच मारुतीच्या वाहनांमध्ये सेलेरियो ही सर्वात महाग आहे. या कारची किंमत 32,500 रुपयांपर्यंत वाढू शकते. मारुती इनव्हिक्टोची किंमत 30 हजार रुपयांनी वाढणार आहे. मारुती ग्रँड विटाराची किंमतही 25 हजार रुपयांनी वाढणार आहे.