मारुती सुझुकी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये आपली नवीन ई विटारा लॉन्च करणार आहे. याची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकशी होऊ शकते. कंपनीने याचा टीझर आधीच दाखवला आहे. सुझुकीने गेल्या वर्षी इटलीच्या मिलान शहरात झालेल्या मोटार शोमध्ये नवीन ई विटारा रिव्हील करण्यात आली होती.
बॅटरी आणि रेंज
नवीन e Vitara मध्ये 49 kWh आणि 61 kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळू शकते. 49 kWh बॅटरी पॅक 142 bhp आणि 189 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याची रेंज सुमारे 390km ते 400km असू शकते. याशिवाय e Vitara मध्ये 61 kWh चा मोठा बॅटरी पॅक मिळू शकतो, जो 180 bhp आणि 300 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याची रेंज मोठ्या बॅटरी पॅकसह 500-560 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.
डिझाइन आणि स्पेस
नवीन ई विटाराची डिझाइन सध्याच्या ग्रँड विटारापेक्षा थोडी वेगळी असेल. याच्या पुढच्या आणि मागच्या भागात काही बदल पाहायला मिळू शकते. याचा व्हीलबेस 2700 मिमी असेल. ई विटारा हार्टेक्ट ई-प्लॅटफॉर्मवर बिल्ड करण्यात आली आहे.
नवीन e Vitara चे इंटीरियर अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असेल आणि यात चांगली सेप्स पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक व्हिटाराला ‘ALGRIP-e’ नावाच्या इलेक्ट्रिक 4WD सिस्टीमसह देखील ऑफर केली जाऊ शकते. याशिवाय या मॉडेलमध्ये नवीन 2-स्पोक स्टीयरिंग व्हील आहे.