मारुतीच्या कार 62 हजारांपर्यंत महाग होणार

पुढील आठवड्यापासून म्हणजेच 8 एप्रिलपासून मारुती सुझुकी कंपनीच्या 7 कार 62 हजार रुपयांपर्यंत महाग होणार आहेत. कच्च्या मालात आणि ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत मारुतीच्या कार स्वस्तात मिळत होत्या, परंतु आता या कार खरेदीसाठी 62 हजारांपर्यंत जादा रक्कम मोजावी लागणार आहे.

मारुती सुझुकीने कारच्या किमती वाढवल्या असल्या तरी या किमती मॉडलनुसार वेगवेगळ्या आहेत. मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा, ब्रेझा, एर्टिगा, एक्सएल6, अल्टो, एस-प्रेसो, बलेनो, डिझायर, स्विफ्ट कारला देशात चांगली मागणी आहे. 1 एप्रिलपासून अन्य कंपन्यांनीही कारच्या किमती वाढवल्या आहेत.