मारुती कार आणि टाटांची वाहने महागणार

आधीच महागाईने होरपळणाऱ्यांना आणखी एक जोरदार झटका बसणार आहे. स्वस्त समजल्या जाणाऱ्या मारुतीच्या कार आता 4 टक्क्यांनी महागणार आहेत. तर टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहने 2 टक्क्यांनी महाग होणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच एप्रिल 2025 पासून किंमती वाढणार आहेत. ही वाढ कंपनीच्या लाइनअपमधील सर्व मॉडेल्सवर वेगवेगळी असणार आहे.