सध्याची मारुती ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. गेल्या महिन्यात याच्या 17,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली. ही कार 1.5L पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे आणि दिल्लीतील Brezza ची एक्स-शोरूम किंमत 8.34 लाख रुपयांपासून सुरू होते. पण आता ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी Brezza आणखी स्वस्त बनवणार आहे. यासाठी त्याच्या इंजिनमध्ये बदल होऊ शकतात. मारुती सुझुकीने गेल्या वर्षी नवीन स्विफ्ट आणि डिझायर लॉन्च केली होती. दोन्ही मॉडेल्समध्ये नवीन 1.2-लिटर थ्री-सिलेंडर झेड-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले होते आणि तेच इंजिन नवीन ब्रेझाला पॉवर देऊ शकते…
सध्या 1.5 लिटर पेट्रोल इंजिन ब्रेझाला पॉवर देते, ज्यामुळे त्याची किंमत इतर SUV पेक्षा थोडी जास्त आहे. सध्या Brezza ची एक्स-शोरूम किंमत 8.34 लाख ते 13.98 लाख रुपये आहे. मोठ्या इंजिनमुळे या वाहनाची किंमत जास्त आहे. मात्र यात 1.2 लीटर थ्री-सिलेंडर झेड-सीरीज पेट्रोल इंजिन समाविष्ट होणार आहे. त्यामुळे याची किंमत लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. पॉवरफुल असण्यासोबतच नवीन इंजिन अधिक मायलेज देखील देऊ शकते.
किती असू शकते किंमत?
नवीन इंजिनसह नवीन Brezza ची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.49 लाख रुपये असू शकते. तसेच याचे मायलेज 22-23 kmpl पर्यंत जाऊ शकते. अअशातच नवीन ब्रेझा महिंद्रा XUV 3XO, Hyundai Venue, Kia Sonet आणि Tata Nexon साठी मोठी स्पर्धक बानू शकते. असं असलं तरी अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही आहे.