![mars](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mars-696x447.jpg)
नासाने मंगळ ग्रहावरचे एक अद्भुत दृश्य कॅमेऱ्यात टिपलेय. मंगळावर रंगीबेरंगी ढगांचे इंद्रधनुष्य दिसत आहेत. अगदी पृथ्वीसारखंच ऋतुचक्र दिसून येत आहे. हे विलोभनीय दृश्य पाहून थक्क व्हायला होतं. मंगळ ग्रहावरचे वातावरण नासाच्या क्युरओसिटी रोव्हरने 17 जानेवारी रोजी आपल्या मास्टर कॅमेऱ्यात टिपले. 16 मिनिटांच्या व्हिडीओतून मंगळावरचे वातावरण नेमके कसे आहे, किती साफ आहे, याचा अंदाज येतो.
ढगांमध्ये सुकलेले बर्फ, जमा झालेला कार्बन डायॉक्साईड दिसून येतो. चकाकणाऱ्या ढगांचे नवे रूप दिसून येते. त्यांना रात्रीचे ढग किंवा रात्रीची चमक असे म्हणता येईल. सूर्य मावळतीला जाताना प्रकाश किरणांचे परिवर्तन होऊन ढग लाल आणि हिरव्या रंगात दिसतात. कधी कधी इंद्रधनुष्यासारखी रंगांची साखळी तयार होते. नासाच्या म्हणण्यानुसार हे दृश्य दिवसाला दिसू शकत नाही.