नोव्हेंबरमध्ये लग्न डिसेंबरमध्ये विभक्त; रान्या रावच्या नवऱ्याचा दावा

सोने तस्करी प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रान्या राव हिचा पती जतीन हुक्केरी याने अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. लग्नानंतर एका महिन्यातच रान्या राव हिच्यापासून वेगळं झाल्याचा दावा जतीन हुक्केरीने केला. जतीन हुक्केरी याचे वकील प्रभुलिंग नवदगी यांनी न्यायालयात निवेदन दिले की, हुक्केरी यांनी नोव्हेंबरमध्ये रान्या राव हिच्याशी लग्न केले आणि दोघे डिसेंबरमध्ये वेगळे झाले. त्यांच्यामध्ये काही मुद्यांवरून बिनसले आणि दोघे अनौपचारिकरित्या वेगळे झाले.

रान्या राव हिच्यासोबतच्या वैवाहिक संबंधांमुळे आपल्याला अटक होईल, या भीतीने जतीन हुक्केरी याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. गेल्या मंगळवारी कर्नाटक हायकोर्टाने पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे.