15 जुलैपर्यंत ‘लगीनघाई, नंतर नोव्हेंबरमध्ये विवाह मुहूर्त

सात महिने बॅण्ड, शहनाई वाजली. आता 15 जुलैपर्यंत मुहूर्त असून ठरलेली लग्नकार्ये 15 जुलैच्या आत उरकावी लागणार आहेत. त्यानंतर ‘सावधान’ चार महिन्यांसाठी बंद होणार आहे. आषाढी एकादशीला लग्नकार्ये थांबणार असून कार्तिकी एकादशीपर्यंत मुहूर्त राहत नाहीत. म्हणजे लगीनघाई 15 जुलैनंतर नोव्हेंबरमध्येच सुरू होईल. या वर्षी मे महिन्यात गुरूचा अस्त होता. त्यामुळे महिनाभर लग्नकार्ये थांबली. आता पुढे फक्त आठ लग्न मुहूर्त शिल्लक असून वर्षभरात 61 लग्न मुहूर्त होते. जुलै महिन्यात 9, 11, 12, 13, 14 आणि 15 जुलै या दिवशी मुहूर्त आहेत.