मॅरेज सर्टिफिकेटसाठी लाच; लिपिकाला बेडय़ा

मॅरेज सर्टिफिकेटसाठी दीड हजारांची लाच स्वीकारणाऱ्या केडीएमसीच्या लाचखोर लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेडय़ा ठोकल्या आहेत. संतोष पाटणी असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत सुरू असलेला भ्रष्ट कारभार चव्हाटय़ावर आला आहे. तक्रारदाराला मॅरेज सर्टिफिकेट काढायचे होते. त्यासाठी त्याने महापालिकेच्या ‘आय’ प्रभागातील नागरिक सुविधा केंद्रात अर्ज केला होता. दाखला तत्काळ देण्यासाठी लिपिक संतोष पाटणी याने दीड हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने याची तक्रार ठाणे एसीबी विभागाकडे केली. तक्रारीत तथ्य आढळ्याने एसीबीच्या पथकाने सापळा रचून संतोषला रंगेहाथ पकडले.