![Pandharinath-Sawant](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/11/Pandharinath-Sawant-696x447.jpg)
ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. लालबागमधील दिग्विजय मिल पत्रा चाळ या त्यांच्या राहत्या घरून दुपारनंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून भोईवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.