संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला (शिखर) वार्षिक यात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. या वर्षी हा यात्रौत्सव 11 ते 17 जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. तर राज्यात सुप्रसिद्ध असणारा मार्लेश्वर- गिरीजादेवीचा विवाह सोहळा (कल्याणविधी) 14 जानेवारीला संपन्न होणार आहे.मकरसंक्रांतीच्या या वार्षिक यात्रोत्सवाकडे तमाम मार्लेश्वर भाविकांचे आतापासूनच लक्ष लागून राहिले आहे. हा वार्षिक यात्रौत्सव यावर्षी 11 ते 17 जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे.