झुकेरबर्ग यांच्या दोन शाळा अखेर बंद

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे कृष्णवर्णीयांसाठी उघडलेल्या दोन शाळा आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक शाळा ही फेसबुकच्या मुख्यालयापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे. झुकेरबर्ग यांच्या पत्नी प्रिसिला चॅन यांनी कॅलिफोर्नियातील पूर्व पालो अल्टो येथे एक शाळा सुरू करण्यासाठी शिक्षणतज्ञ मेरडिथ लिऊ यांच्याशी भागीदारी केली होती. गेल्या आठवडय़ात शाळा अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शाळा बंद होण्यासंबंधी कळवले आहे.