जगातील सर्वाधिक श्रीमंत कोण? यावर नेहमीच चर्चा होत असते. यामध्ये अनेक दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेफ बेझोसना मागे टाकत मार्क झुकरबर्ग जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.
मेटा शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने झुकरबर्ग यांच्या संपत्तीतही वाढ होताना दिसत आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मेटाव्हर्स शेअर्सने मोठी झेप घेतली होती. आता शेअर्समध्ये 23% टक्क्यांनी वाढ झाली आहे.