
मार्क कार्नी कॅनडाचे 24 वे पंतप्रधान बनले आहेत. आज त्यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळानेही शपथ घेतली. हा सोहळा राजधानी ओटावाच्या रिडयू हॉलच्या बॉलरूममध्ये पार पडला. कार्नी यांनी 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या लिबरल पार्टीच्या नेतेपदाची निवडणूक जिंकली होती. त्यांना एकूम 85.9 टक्के मते मिळाली. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टडो यांनी आज गव्हर्नर जनरल यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.