बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या आणि परभणी जिह्यातील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू या घटनांच्या निषेधार्थ उद्या मुंबईत सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता या मोर्चाला मेट्रो सिनेमा येथून सुरूवात होऊन आझाद मैदानात मोर्चाची सांगता होईल. महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य पक्ष सहभागी होणार आहेत.