मनोरंजन – मराठी चित्रपटासाठी थिएटर्स नाहीत

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषिक चित्रपटाला महाराष्ट्रात स्क्रीन्स मिळत नाही, यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते, अशी नाराजी अभिनेता प्रथमेश परबने व्यक्त केली. सोशल मीडियावर पोस्ट करत तो म्हणाला की, चित्रपटासाठी संपूर्ण टीम खूप मेहनत घेत असते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचे प्रेम अनुभवायला मिळते. मात्र, तो दाखवायला थिएटर्सच नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

‘सिकंदर’चा टीझर पुढे ढकलला

सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सिकंदर’चा टीझर सलमानच्या वाढदिवशी म्हणजेच 27 डिसेंबरला जारी करण्यात येणार होता, परंतु देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे हा टीझर एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. सिकंदरचा टीझर आता 28 डिसेंबरला सकाळी 11 वाजेपर्यंत जारी केला जाणार आहे.

‘पुष्पा-2’ने 1700 कोटी कमावले

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा-2’ ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. वाईल्डफायर असलेल्या पुष्पाने वर्ल्डवाईड म्हजेच जगभरात तब्बल 1700 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. पुष्पाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. या चित्रपटाने याआधी अवघ्या सात दिवसांत एक हजार कोटी रुपये कमवण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.