मुंबईत मराठी आमदारांची संख्या घटली, गुजराती आणि उत्तर भारतीय आमदारांच्या संख्येत वाढ

2024 च्या निवडणुकीनंतर मुंबईतल्या मराठी आमदारांची संख्या कमी झाली आहे. 2019 साली मुंबईत 25 मराठी भाषिक आमदार होते. त्यात घट होऊन आता मुंबईत 23 मराठी भाषिक आम आमदार निवडून आले आहेत.

मिड डे या वृत्तपत्रात याबाबत वृत्त देण्यात आले आहे. बोरिवलीत 2019 साली भाजपकडून सुनील राणे निवडून आले होते. 2024 ला भाजपने संजय उपाध्याय यांना तिकीट दिले होते आणि ते निवडूनही आले. अंधेरी पश्चिम मतदारसंघात भाजपने मूरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती आणि ते निवडून आले.

2019 साली मुंबईत चार गुजराती आणि मारवाडी भाषिक आमदार होते. त्यात मंगल प्रभात लोढा (मलबार हिल) पराग शाह (घाटकोपर पूर्व) मिहीर कोटेचा (मुलुंड), योगेश सागर (चारकोप). यंदा मुरजी पटेल यांचा विजय झाल्याने गुजराती आमदारांची संख्या पाच झाली आहे. सायन कोळीवाडा मतदारसंघातून कॅप्टन तमिळ सेल्वन यांचा विजय झाला आहे. मुंबईतले ते एकमेव दाक्षिणात्य मदार आहे. वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पुर्वमधून अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी यांचा पराभव केल्याने इथून मराठी आमदार निवडून आला आहे.

2019 साली बोरीवलीतून विद्या ठाकूर यांचा विजय झाला होता. 2024 साली विद्या ठाकूर यांचा पुन्हा विजय झाला. तर बोरीवलतून संजय उपाध्याय यांचा विजय झाल्याने उत्तर भारतीय आमदारांची संख्या दोन झाली आहे.