पर्यावरण, सामाजिक चळवळीतील लेखक हरपला; ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून पर्यावरणाची मोठी चळवळ उभारणारे ज्येष्ठ साहित्यिक व धाराशीव येथील 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रातील लढवय्या कार्यकर्ता हरपला. होली स्पिरीट चर्च येथे दिब्रिटो यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेखन, ख्रिस्ती धर्मप्रचार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे फ्रान्सिस दिब्रिटो हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वसईच्या जेलाडी येथील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 1972 साली पॅथलिक धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली. तसेच धर्मशास्त्र्ाामध्ये एम.ए. केले. ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून नंतर त्यांची सर्वत्र ओळख झाली. संत साहित्याचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. वसईतील साहित्यिक, सामाजिक, धार्मिक चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱया ‘सुवार्ता’ मासिकाचे संपादन त्यांनी 1983 ते 2007 या कालावधीत केले.

साहित्यसंपदा

आनंदाचे अंतरंग ः मदर तेरेसा ओऑसिसच्या शोधात (प्रवासानुभव) ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र) ख्रिस्ती सण आणि उत्सव ग तेजाची पाऊले (ललित)नाही मी एकला (आत्मकथन) संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची ः इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास सुबोध बायबल ः नवा करार (‘बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद) सृजनाचा मळा ग सृजनाचा मोहोर परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक) मुलांचे बायबल (चरित्र).