
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात आज पहाटे चेंगराचेंगरी होऊन 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त हजारो भाविकांनी अमृतस्नान करण्यासाठी गर्दी केली आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे ही दुर्दैवी घटना घडली. महाकुंभसाठी गेलेल्या अनेक इन्फ्लुएन्सरनी तेथील परिस्थितीची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एका महिला इन्फ्लुएन्सरने कुंभमेळ्यातील भीषण परिस्थिती समोर आणली. किशोरी असे या तरुणीचे नाव आहे. किशोरी महाकुंभमेळ्यात उपस्थित असून तेथील व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. दरम्यान, तिने अमृतस्नाना दरम्यानचाही व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओतून तिने कुंभमेळ्यातील सद्य परिस्थितीची माहिती भाविकांना दिली आहे.
View this post on Instagram
मी महाकुंभचे रिअल टाईम अपडेट तुम्हाला देतेय. माझी तुम्हाला विनंती आहे. पवित्र स्नानाच्या दिवशी महाकुंभला जराही येऊ नका. आज मौनी अमावस्येचं पवित्र स्नान आहे. इथली परिस्थिती खूपच भयंकर झाली आहे. लोक एकमेकांच्या अंगावर पडत आहेत. लोकं अक्षरश: मरणाच्या दारावर टेकलेत. इथला एकूण एक व्यक्ती स्वत: जीव वाचवण्यासाठी धडपड करतोय. कोणीच कोणाची मदक करत नाहीए. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतेय, प्लीज येऊ नका. तरी तुम्हाला जर यायचं असेल तर संगम घाटावर जराही येऊ नका. यायचंच असेल तर अरेल घाट, यमुना घाट, गंगा घाटावर जा. मला वाटतं पुण्य कमावलं नाही तरी चालेल, जीव वाचवणं जास्त गरजेचं आहे, असे ती या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.