मराठी अभिनेत्याची 61 लाखांची फसवणूक

पेड टास्क आणि गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर ठगाने मराठी हास्य कलाकाराच्या बँक खात्यावर डल्ला मारला आहे. 61 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी उत्तर सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सायबर ठग हे विविध कारण सांगून नागरिकांची फसवणूक करतात. गेल्या काही दिवसापासून टास्कच्या नावाखाली नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे. अशाच प्रकारे मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात अभिनय करणाऱया हास्य कलाकाराला चुना लावला गेला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याना एका महिलेने मेसेज केला. टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियावर आलेल्या लिंकना लाईक्स करायचे आहे. प्रत्येक लाईकसला 150 रुपये दिले जातील असे त्यांना सांगितले. घर बसल्या पैसे कमावण्यास चांगले असल्याच्या ठगाने त्याना भूलथापा मारल्या.

त्यावर अभिनेत्याने विश्वास ठेवला

सुरुवातीला त्याना 11 हजार रुपये पेड टास्कच्या माध्यमातून मिळाले. अतिरिक्त 30 टक्के कमिशन आणि लाईक्स केलेल्या लिंक्सचा मोबदला हवा असल्यास अधिक गुंतवणूक करावी लागेल असे त्याना सांगण्यात आले. जे पुढे दिले जाणारे टास्क हे पेड टास्क असल्याचे त्याना सांगण्यात आले. त्यानंतर अभिनेत्याने सुरुवातीला किरकोळ रक्कम गुंतवली. रक्कम गुंतवल्यानंतर त्याच्या इ वॉलेटवर काही रक्कम जमा झाल्याचे दिसले. त्या रक्कमेला अभिनेता बळी पडला. त्याने 27 लाख रुपये गुंतवले. त्यानंतर अभिनेत्याने त्या इ वॉलेटवरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ठगाने तुमचा टास्क 100 टक्के पूर्ण झाल्यावर रक्कम काढता येईल अशा भूलथापा मारल्या. ठगाने अभिनेत्याकडून आणखी 19 लाख घेतले. तसेच 30 टक्के कर देखील भरले. ठगाने त्याना 61 लाख रुपये भरले. पैसे भरल्यानंतर ठगाने त्याना आणखी 30 टक्के कर भरण्यास सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने उत्तर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.