इन्स्टाग्रामवर लाईक्स वाढवण्याचा नाद अंगाशी आला, अभिनेता सागर कारंडेला सायबर चोरांनी लाखोंचा गंडा घातला

सायबर फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशातच सामान्य लोकचं नाही तर मोठे कलाकारही या फसवणुकीला बळी पडत आहेत. दरम्यान मराठी Entertainment शो हास्य जत्रा फेम सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी 3 अज्ञातांविरोधात मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

सायबर फसवणुकीच्या जाहिराती किंवा सरकारतर्फे नागरिकांना सावधान करणारे रेकॉर्ड कॉल आपण सातत्याने ऐकतो. मात्र तरीही सामान्य असो वा सेलिब्रीटी सायबर फसवणुकीचे शिकार होताना दिसतात. आपल्या एका चुकीमुळे आपल्या आयुष्याची जमापुंजी एका क्षणात आपल्या डोळ्यासमोरून हिसकावली जाते. अभिनेता सागर कारंडे सोबतही असंच काहीस घडलं. इन्स्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात 150 रुपयांचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे.

सागरला फसवण्यासाठी आधी त्याचा विश्वास संपादन करणे गरजेच होत. यासाठी सायबर चोरट्यांनी सागरच्या खात्यात 22 हजार रुपये देखील पाठवले. यानंतर हळूहळून आरोपींनी सागरला तब्बल 61 लाखांचा गंडा घातला. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saagar Karande 😍 (@saagarkarande)