मराठी भाषा विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी 2024 सालचा श्री. पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये मानपत्र व सन्माचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 27 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडियासमोर आयोजित दिमाखदार सोहळय़ात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. रमेश सूर्यवंशी यांना तर मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला. 2 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 27 फेब्रुवारी रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाचे ‘कवितांचे गाव’ म्हणून उद्घाटन होणार आहे. रत्नागिरी येथील कवी केशवसुत यांच्या मालगुंड गावास ‘पुस्तकाचे गाव’ करण्यात येणार आहे.